Product SiteDocumentation Site

Red Hat Enterprise Linux 5

5.8 प्रकाशन टिपा

Red Hat Enterprise Linux 5.8 करीता प्रकाशन टिपा

आवृत्ती 8


कायदेशीर सूचना

Copyright © 2012 Red Hat, Inc.
The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
MySQL® is a registered trademark of MySQL AB in the United States, the European Union and other countries.
All other trademarks are the property of their respective owners.


1801 Varsity Drive
 RaleighNC 27606-2072 USA
 Phone: +1 919 754 3700
 Phone: 888 733 4281
 Fax: +1 919 754 3701

सारांश
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षा व बग निवारण एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 5.8 प्रकाशन टिपा दस्तऐवज Red Hat Enterprise Linux 5 कार्यप्रणाली व या किर्कोळ प्रकाशनसाठी निर्देशीत सहभागी ऍप्लिकेशन्स्करीता केलेल्या मुख्य बदलची नोंदणी करतो. सर्व बदलांकरीता तपशील टिपा किर्कोळ प्रकाशनमध्ये टेकनिकल नोटस् येथे उपलब्ध आहेत.

प्रस्तावना
1. प्रतिष्ठापन
2. कर्नल
2.1. कर्नल प्लॅटफॉर्म सुधारणा
2.2. कर्नल मुख्य गुणविशेष
3. डिव्हाइस ड्राइव्हर्स्
3.1. स्टोरेज ड्राइव्हर्स्
3.2. नेटवर्क ड्राइव्हर्स्
3.3. ग्राफिक्स् ड्राइव्हर्स्
4. फाइल प्रणाली व स्टोरेज व्यवस्थापन
5. ओळख व इंटरऑपरेबिलिटि
6. एंटाइटलमेंट
7. सेक्युरिटि, स्टँडर्डस् व सर्टिफिकेशन
8. क्लस्टरिंग व हाय अव्हेलेबिलिटि
9. वर्च्युअलाइजेशन
9.1. Xen
9.2. KVM
9.3. SPICE
10. सामान्य सुधारणा
A. आवृत्ती इतिहास

प्रस्तावना

प्रकाशन टिपा, Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचा उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 5.8 सुधारणाकरीता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरीता, टेकनिकल टिपा पहा.

टीप

Red Hat Enterprise Linux 5.8 प्रकाशन टिपांच्या सर्वात अलिकडील आवृत्तीकरीता ऑनलाइन प्रकाशन टिपा पहा.

धडा 1. प्रतिष्ठापन

IPoIB वरील प्रतिष्ठापन
Red Hat Enterprise Linux 5.8 IP ओव्हर इंफिनिबँड (IPoIB) इंटरफेसवरील प्रतिष्ठापनकरीता समर्थन पुरवतो.

धडा 2. कर्नल

2.1. कर्नल प्लॅटफॉर्म सुधारणा

पावर मॅनेजमेंट क्वालिटि ऑफ सर्व्हिस
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये पावर मॅनेजमेंट क्वालिटि ऑफ सर्व्हिस (pm_qos) इंफ्रास्टक्चरकरीता समर्थन समाविष्ट केला आहे. सध्याचे समर्थीत pm_qos घटकांकरीता ड्राइव्हर्स्, उपप्रणालींकरीता व युजर स्पेस् ॲप्लिकेशन्स् तर्फे परफॉरमंस अपेक्षांची नोंदणी करण्यासाठी pm_qos इंटरफेस कर्नल व युजर मोड इंटरफेस पुरवतो: cpu_dma_latency, network_latency, network_throughput. अधिक माहितीकरीता, /usr/share/doc/kernel-doc-<VERSION>/Documentation/power/pm_qos_interface.txt पहा.
PCIe 3.0 समर्थन
ID-आधारित आर्डरिंग, OBFF (ऑप्टिमाइज्ड् बफर फ्लश/फिल) सुरू करा/बंद करा समर्थन, व लेटंसि टॉलरेंस रिपोर्टिंग सुरू करा/बंद करा समर्थन समाविष्ट करून Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये PCIe 3.0 फूल फंक्शन समर्थन पुरवते.
ALSA HD ऑडिओ समर्थन
Intel च्या पुढील प्लॅटफॉर्म कंट्रोलर हबकरीता ALSA HD Aऑडिओ समर्थन समाविष्ट केले आहे.
साधन IDs समाविष्ट केले
Intelच्या पुढील प्लॅटफॉर्म कंट्रोलर हबकरीता संपूर्ण समर्थन पुरवण्यासाठी खालील ड्राइव्हर्सकरीता साधन आयडिज् समाविष्ट केले आहे: SATA, SMBus, USB, ऑडिओ, वॉचडॉग, I2C.
स्टारटेक PEX1P
स्टारटेक 1 पोर्ट PCI एक्सप्रेस पॅरलल पोर्ट साधनकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
configure-pe RTAS कॉल
PowerPC प्लॅटफॉर्मसाठी configure-pe RTAS (रनटाइम ॲबस्ट्रॅक्शन सर्व्हिसेस्) कॉलकरीता समर्थन समाविष्ट केले आहे.
JSM ड्राइव्हर सुधारित केले
IBM POWER7 प्रणालींवरील Bell2 (PLX चिपसह) 2-पोर्ट अडॅप्टरकरीता समर्थन पुरवण्यासाठी JSM ड्राइव्हरला सुधारित केले आहे. याव्यतिरिक्त, EEH समर्थन JSM ड्राइव्हरकरीता समाविष्ट केले आहे.

2.2. कर्नल मुख्य गुणविशेष

RSS व स्वॅप आकार माहिती
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, /proc/sysvipc/shm फाइलमध्ये (जे वापरण्याजोगी शेअर्ड मेमरिची सूची पुरवते) आत्ता RSS (रेसिडंट सेट साइज—मेमरिमधील प्रोसेसचा भाग) व स्वॅप आकार माहिती समाविष्ट केली आहे.
OProfile समर्थन
सर्व कोर घटनांकरीता समर्थन पुरवून (प्रिसाइज इव्हेंट-बेस्ड् सॅम्पलिंग) Intel च्या सँडि ब्रिज् प्लॅटफॉर्मकरीता OProfile प्रोफाइलरकरीता समर्थन समाविष्ट केला आहे.
वॅकॉम बॅम्बू MTE-450A
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये वॅकॉम बॅम्बू MTE-450A टॅबलेटकरीता समर्थन समाविष्टीत आहे.
X-किज् जॉग व शटल प्रो
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये X-किज् जॉग व शटल प्रो साधनकरीता समर्थन समाष्टित आहे.
बाँडिंग घटक NICs करीता सर्व वेग स्वीकारतो
कर्नलमधील बाँडिंग घटक आत्ता कोणत्याहि नेटवर्क इंटरफेस कंट्रोलरकरीता सध्याचे लिंकवेग कळवतो. पूर्वी, बाँडिंग घटक फक्त 10/100/1000/10000 चा वेग कळवत असे. हा बदल ब्लेड एंक्लोजर वातावरणात लिंक-वेगचे योग्य रिपोर्टिंग पुरवतो जे विना-मानक वेग जसे कि 9 Gbs याचा वापर करू शकते.
स्वीकार्य सिरियल संवादाची कमाल संख्या
CONFIG_SERIAL_8250_NR_UARTS घटक कर्नलतर्फे निर्देशीत सिरिअल इंटरफेसची कमाल संख्या निर्देशीत करतो. Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, 32 पेक्षा जास्त (व 64 पर्यंतचे) कंसोल जोडणी असणाऱ्या प्रणालींकरीता CONFIG_SERIAL_8250_NR_UARTS घटकाचे मूल्य 64 करीता वाढवले आहे.
/etc/kdump.conf मधील blacklist पर्याय
केडम्प संरचनाकरीता आत्ता blacklist पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय घटकांना initramfs मध्ये लोड करण्यापासून रोखते. अधिक माहितीकरीता, kdump.conf(5) मॅन्युअल पान पहा.
Kdump initrd मधील fniciscsi समर्थन
केडम्पच्या इनिशिअल RAM डिस्क (initrd) करीता fniciscsi ड्राइव्हर्ससाठी समर्थन समाविष्ट केले आहे.
Xen HVM अतिथीवरील केडम्प
Xen HVM अतिथीवरील केडम्प आत्ता Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून सुरू केले आहे. Intel 64 हायपरवाइजरचा वापर करून Intel CPU सह एम्युलेटेड (IDE) डिस्कवर स्थानीय डम्प पद्धती एकमेव समर्थीत लागूकरण आहे. लक्षात ठेवा /etc/kdump.conf फाइलमध्ये डम्प लक्ष्य निर्देशीत करणे आवश्यक आहे.

धडा 3. डिव्हाइस ड्राइव्हर्स्

3.1. स्टोरेज ड्राइव्हर्स्

  • IBM Power Linux RAID SCSI HBAs करीता ipr ड्राइव्हरला SAS VRAID फंकशन्स् सुरू करण्यासाठी व नवीन अडॅप्टर्सकरीता वर्णन समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
  • megaraid ड्राइव्हरला आवृत्ती 5.40 करीता सुधारित केले आहे, जे FastPath I/O करीता डिग्रेडेड RAID 1 सह कार्य करण्यासाठी निवारण पुरवते.
  • Intel पँथर पॉइंट डिव्हाइस IDs करीता AHCI (ॲडवांस्ड् होस्ट कंट्रोलर इंटरफेस) मोड समाविष्ट करण्यासाठी पँथर पॉइंट PCH ड्राइव्हरला सुधारित केले.
  • qla2xxx 4G व 8G ड्राइव्हर फर्मवेअर यास आवृत्ती 5.06.01 करीता सुधारित केले.
  • QLogic फाइबर चॅनल HBAs करीता qla2xxx ड्राइव्हरला आवृत्ती 8.03.07.09.05.08-k करीता सुधारित केले आहे, जे अपयशी झाल्यावर ISP82xx करीता समर्थन पुरवण्यासाठी डम्प (एक minidump) प्राप्त करते.
  • qla4xxx ड्राइव्हरला आवृत्ती 5.02.04.00.05.08-d0 करीता सुधारित केले आहे.
  • lpfc ड्राइव्हर करीता Emulex फाइबर चॅनल होस्ट बस अडॅप्टर्स्ला आवृत्ती 8.2.0.108.1p करीता सुधारित केले आहे.
  • cciss ड्राइव्हरला नवीन आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे CCISS सिम्पल मोडकरीता आदेश ओळ स्विच्च् पुरवते.
  • pci_disable साधन पर्याय व शटडाउन रुटिनला समर्थन पुरवण्यासाठी ServerEngines BladeEngine 2 Open iSCSI साधनांकरीता be2iscsi ड्राइव्हरला सुधारित केले आहे.
  • Broadcom NetXtreme II iSCSI करीता bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.0.3 करीता सुधारित केले आहे.
  • कर्नल मल्टिपाथ ड्राइव्हरला तपशील SCSI I/O त्रुटी समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.
  • bfa फर्मवेअरला आवृत्ती 3.0.2.2 करीता सुधारित केले.
  • bfa ड्राइव्हरला खालील सुधारणा समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे:
    • फ्लॅश विभाजनांच्या संरचनाकरीता समर्थन.
    • fcport आकडेवारि गोळा व पूर्ववत् करण्यासाठी समर्थन.
    • I/O प्रोफाइलिंगकरीता समर्थन.
    • RME इंटरप्ट हाताळणीकरीता सुधारित केले.
    • FC-ट्रांस्पोर्ट असिंक्रोनस इव्हेंट सूनचाकरीता समर्थन.
    • फिजिकल लेयर कंट्रोल (PHY) चौकशीकरीता समर्थन.
    • होस्ट बस अडॅप्टर्स् (HBA) विश्लेषणकरीता समर्थन.
    • स्मॉल फॉर्म फॅक्टर (SFP) प्राप्त करण्यासाठी समर्थन.
    • CEE माहिती व आकडेवारि चौकशीकरीता समर्थन.
    • फॅब्रिक असाइंड ॲड्ड्रेस (FAA) करीता समर्थन.
    • ड्राइव्हर/fw आकडेवारि गोळा करण्यासाठी व अडॅप्टर/ioc सुरू/बंद कार्यांकरिता समर्थन.
  • mpt2sas ड्राइव्हरला आवृत्ती 09.100.00.00 करीता सुधारित केले, जे ग्राहक निर्देशीत ब्रँडिंगकरीता समर्थन पुरवते.
  • mptsas ड्राइव्हर यास आवृत्ती 3.04.20rh करीता सुधारित केले.
  • isci ड्राइव्हरला स्टेट मशीन इंटरफेसकरीता टाइप सेफ्टि समाविष्ट करण्यासाठी व Intel च्या पुढील चिपसेटकरीता समर्थनसाठी सुधारित केले आहे.
  • सुधारित iscsi-initiator-utils संकुलचा भाग म्हणून uIP ड्राइव्हरला आवृत्ती 0.7.0.12 करीता सुधारित केले.
  • megaraid_sas ड्राइव्हरला आवृत्ती 5.40-rh1 करीता सुधारित केले.

3.2. नेटवर्क ड्राइव्हर्स्

  • bnx2x ड्राइव्हर फर्मवेअरला आवृत्ती 7.0.23 करीता सुधारित केले आहे, जे नवीन ब्रॉडकॉम 578xx चिप्स्करीता समर्थन पुरवते.
  • bnx2x ड्राइव्हरला आवृत्ती 1.70.x करीता सुधारित केले आहे.
  • bnx2i ड्राइव्हरला आवृत्ती 2.7.0.3+ करीता सुधारित केले आहे.
  • bnx2 ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.11 करीता सुधारित केले आहे.
  • cnic ड्राइव्हरला आवृत्ती 2.5.3+ करीता सुधारित केले आहे.
  • चेलसिओ T3 फॅमिलिचे नेटवर्क साधणांकरीता cxgb3 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • चेलसिओ टर्मिनेटर4 10G युनिफाइड वायर नेटवर्क कंट्रोलर्स् करीता cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • iw_cxgb4 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • netxen_nic ड्राइव्हरला आवृत्ती 4.0.77 करीता सुधारित केले, जे VLAN RX HW ॲक्सिलरेशनकरीता समर्थन पुरवते.
  • ब्रॉडकॉम टिगॉन3 इथरनेट साधनांकरीता tg3 ड्राइव्हरला आवृत्ती 3.119 करीता सुधारित केले आहे.
  • Intel 10 Gigabit PCI Express नेटवर्क साधनांकरीता ixgbe ड्राइव्हरला आवृत्ती 3.4.8-k करीता सुधारित केले आहे.
  • ixgbevf ड्राइव्हरला अपस्ट्रिम आवृत्ती 2.1.0-k करीता सुधारित केले आहे.
  • igbvf ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • Intel Gigabit इथरनेट अडॅप्टर्सकरीता igb ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे, जे एंट्रोपि समर्थन समाविष्ट करते.
  • Intel 82563/6/7, 82571/2/3/4/7/8/9, व 82583 PCI-E श्रेणीच्या कंट्रोलर्सकरीता e1000e ड्राइव्हरला आवृत्ती 1.4.4 करीता सुधारित केले आहे.
  • Intel PRO/1000 PCI व PCI-X श्रेणीच्या अडॅपटर्सकरीता e1000 ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्तीकरीता सुधारित केले आहे.
  • bna ड्राइव्हरला आवृत्ती 3.0.2.2 करीता सुधारित केले आहे, जे ब्रोकेड 1860 एनीIO फॅब्रिक अडॅप्टरकरीता समर्थन पुरवते
  • qlge ड्राइव्हरला आवृत्ती 1.00.00.29 करीता सुधारित केले आहे.
  • HP NC-Series QLogic 10 Gigabit सर्व्हर अडॅप्टर्स् करीता qlcnic ड्राइव्हरला आवृत्ती 5.0.18 करीता सुधारित केले.
  • ServerEngines BladeEngine2 10Gbps नेटवर्क साधनांकरीता be2net ड्राइव्हरला सर्वात नवीन अपस्ट्रिम आवृत्ती करीता सुधारित केले आहे.
  • Cisco 10G इथरनेट साधनांकरीता enic ड्राइव्हरला आवृत्ती 2.1.1.24 करीता सुधारित केले आहे.
  • nbd ड्राइव्हरला वापरकर्ता तर्फे ठरवण्याजोगी वेळसमाप्ति (NBD_SET_TIMEOUT) समाविष्ट करण्यासाठी सुधारित केले आहे.

3.3. ग्राफिक्स् ड्राइव्हर्स्

  • Intelच्या i810 ग्राफिक्स् ड्राइव्हर (xorg-x11-drv-i810 संकुल तर्फे पुरवलेले) यास Ironlake इंटिग्रेटेड ग्राफिक्स्सह Westmere चिपसेटस् करीता विविध त्रुटींचे निवारनकरीता सुधारित केले आहे .
  • मॅट्रॉक्स् mga विडिओ कार्ड ड्राइव्हरला ServerEngines Pilot 3 (क्रोनोस् 3) चिप्स् करीता संपूर्ण रेजोल्युशन समर्थन पुरवण्यासाठी सुधारित केले आहे.

धडा 4. फाइल प्रणाली व स्टोरेज व्यवस्थापन

--nosync पर्याय CLVM मिरर्ड वॉल्युम एक्सटेंशन
क्लस्टर्ड् LVM मध्ये नवीन मिरर्ड लॉजिकल खंड विस्तारित करण्यासाठी --nosync पर्याय. --nosync पर्याय निर्देशीत केल्यावर, क्लस्टर्ड मिरर्ड लॉजिकल वॉल्युम विस्तारित केल्याने एक्सटेंशन नंतर वॉल्युमची समजोडणी अशक्य आहे, रिकामे डाटाटे रिसोअर्स् निर्देशीत समजुळणी वगळली जाते.
ext4 चे स्वयं पुनःआकार
-r/--resizefs पर्यायसह lvextend आदेश सुरू केल्यावर, ext4 फाइल सिस्टम स्वयंरित्या स्वयं पुनःआकार करते. resize2fs सह स्वहस्ते पुनःआकार याची आत्ता आवश्यकता नाही.
NFS क्लाएंटस् तर्फे वापरलेले असुरक्षित पोर्टस्
Red Hat Enterprise Linux 5.8 सह, NFS क्लाएंटस् असुरक्षित पोर्टस्चा वापर करतात (म्हणजेच, 1024 व त्यावरील).
LVM तर्फे सक्रिय मल्टिपाथ साधनांचे स्कॅन अशक्य
LVM यापुढे मल्टिपाथ सदस्य साधने (सक्रिय मल्टिपाथ साधनांकरीता अंतर्भुत मार्ग) स्कॅन करत नाही व त्यामुळे उच्च स्तरिय साधनांची पसंती करतो. /etc/lvm/lvm.conf मधील multipath_component_detection पर्यायसह या वर्तनला बंद करणे शक्य आहे.

धडा 5. ओळख व इंटरऑपरेबिलिटि

DNS SRV रेकॉर्डस् करीता समर्थन
DNS SRV रेकॉर्ड समर्थन nss_ldap संकुलकरीता समाविष्ट केले आहे.
पेज्ड् LDAP लूकअप्स् करीता समर्थन
एका विनंतीतर्फे पुरवलेले एकापेक्षा जास्त रेकॉर्डस् हाताळण्याकरीता SSSD आत्ता पेज्ड् LDAP लूकअप सुरू करू शकतो.
नवीन SSSD संरचना पर्याय
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, SSSD आत्ता /etc/sssd/sssd.conf फाइलमधील खालील नवीन संरचना पर्यायकरीता समर्थन पुरवतो:
  • override_homedir
  • allowed_shells
  • vetoed_shells
  • shell_fallback
  • override_gid
या पर्यायविषयी अधिक माहितीकरीता, sssd.conf(5) मॅन्युअल पान पहा.

धडा 6. एंटाइटलमेंट

पूर्वनिर्धारितपणे RHN क्लासिक नीवडले
प्रणालीला फर्स्टबूटसह नोंदणी करताना, पूर्वनिर्धारितपणे RHN क्लासिक पद्धतीचा वापर केला जातो.
सबस्क्रिप्शनच्या पुनःनुतनीकरन नंतर प्रमाणपत्र स्वयं पुनःनिर्माण करणे
सबस्क्रिप्शनच्या पुनःनुतनीकरण नंतर आत्ता स्वयंरित्या नवीन एंटाइटलमेंट प्रमाणपत्र निर्माण करणे शक्य आहे. या सुधारणा पूर्वी, ग्राहकांना सॉफ्टवेअर सुधारणा व इतर सबस्क्रिप्शन सर्व्हिसेस् प्राप्त करण्यासाठी स्वहस्ते प्रमाणपत्र पुनःनिर्माण करायची आवश्यकता पडत असते. स्वयंरित्या प्रमाणपत्र पुनःनिर्माण केल्याने सर्व्हिस इंटरपश्न्स् कमी आढळत असे. प्रमाणपत्राचे स्वयं पुनःनिर्माण अपयशी झाल्यास वापरकर्त्यांना सूचीत केले जात असे. अधिक माहितीकरीता, https://www.redhat.com/rhel/renew/faqs/पहा.
सबस्क्रिप्शन्स् स्टॅक करत आहे
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये सबस्क्रिप्शन ट्रॅकिंगकरीता समर्थन पुरवले आहे. यामुळे सहत्वताकरीता वापरकर्त्यांना एका मशीनवरील सबस्क्रिपशन्स्चा संच एकत्र करण्यास परवानगी मिळते. सबस्क्रिप्शन ट्रॅकिंगविषयी अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 5 वितरण पुस्तिका पहा.
RHN क्लासिक पासून सर्टिफिकेट आधारित RHN करीता स्थानांतरन
RHN क्लासिक ग्राहकांना प्रमाणपत्र आधारित RHN करीता स्थानांतरनसाठी Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये नवीन साधन समाविष्टीत केले आहे. अधिक माहितीकरीता, Red Hat Enterprise Linux 5 वितरण पुस्तिका पहा.

धडा 7. सेक्युरिटि, स्टँडर्डस् व सर्टिफिकेशन

SCAP 1.1
SCAP 1.1 (सेक्युरिटि कंटेंट ऑटोमेशन प्रोटोकॉल) सुविधा पुरवण्याकरीता OpenSCAP ला सुधारित केले आहे.
DigiCert प्रमाणपत्राला openssl मध्ये समाविष्ट केले
Red Hat Enterprise Linux 5.8 सह, openssl संकुलमध्ये /etc/pki/tls/certs/ca-bundle.crt फाइल तर्फे DigiCert प्रमाणपत्र समाविष्टीत आहे (ज्यामध्ये विश्वसार्ह रूट CA प्रमाणपत्र समाविष्टीत आहे).

धडा 8. क्लस्टरिंग व हाय अव्हेलेबिलिटि

हाय अव्हेलेबिलिटि व रेजिलिअंट स्टोरेज वाहिनींपासून संकुले प्रतिष्ठापीत करत आहे
Red Hat Enterprise Linux 5.8 बिटा प्रणालीवर, cdn.redhat.com पासून clustercluster-storage संकुले प्रतिष्ठापीत करून संबंधित उत्पादने परिणामस्वरूपी आढळले, हाय अव्हेलिबिलिटिरेसिलिअंट स्टोरेज, जे अजूनही प्रतिष्ठापीत झाले नाही. clustercluster-storage पासून संकुले प्रतिष्ठापीत करण्यासाठी सबस्क्रिप्शन क्रमांक पाठवून, Red Hat Enterprise Linux 5.8 बिटा प्रतिष्ठापन मिडियाचा वापर करणे Red Hat शिफारसीय करतो. सबस्क्रिप्शन क्रमांकविषयी अधिक माहितीकरीता, ज्यास प्रतिष्ठापन क्रमांक देखील म्हटले जाते, खालील KBase लेख वाचा.

धडा 9. वर्च्युअलाइजेशन

9.1. Xen

PV अतिथीकरीता होस्ट CD-ROM जोडत आहे
होस्ट CD-ROM ला पॅरावर्च्युअलाइज्ड अतिथीकरीता वर्च्युअल ब्लॉक साधन म्हणून जोडण्याकरीता समर्थन सुधारित केले आहे.
अतिथी VBDs चे डायनॅमिक पुनःआकार
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, Xen अथिथीमधील वर्च्युअल ब्लॉक साधने यजमानकडील बॅकिंग साधनांचे ऑनलाइन पुनःआकार दाखवते .

9.2. KVM

SPICE QXL ड्राइव्हर्स्ला virtio-win करीता समाविष्ट केले
सोपे प्रतिष्ठापन सुरू करण्यासाठी व MSI इंस्टॉलरला चालवल्याविना ड्राइव्हर्सला सुधारित करण्यासाठी, SPICE QXL ड्राइव्हर्सला virtio-win RPM संकुलात समाविष्ट केले आहे.

9.3. SPICE

नवीन pixman संकुल
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये नवीन pixman संकुल समाविष्टीत आहे जे कमी-स्तरीय पिक्सेल मॅनिपुलेशन लाइब्ररि पुरवते व इमेज कम्पोजिटिंग व ट्रपेजॉइड रास्टराइजेशन सारखे गुणविशेष पुरवते. pixman संकुलला spice-client संकुलचे अवलंबन म्हणून समाविष्ट केले जाते.

धडा 10. सामान्य सुधारणा

सुधारित PDF/A समर्थन
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये PDF/A करीता सुधारित समर्थन समाविष्टीत आहे— पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅटची ISO-मानक आवृत्ती— GhostScript आवृत्ती 9.01 करीता सुधारित करून.
httpd करीता connectiontimeout घटक
httpd सर्व्हिसमध्ये नवीन connectiontimout घटक समाविष्टीत आहे जे बॅक-एंडशी जोडणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ निर्देशीत करते. हे घटक निर्देशीत करून, अपॅचितर्फे लोड बॅलेंसिंगचा वापर करताना क्लाएंटकरीता निर्देशीत वेळसमाप्ति त्रुटींची संख्या बऱ्यापैकी कमी होते.
iptables reload पर्याय
iptables सर्व्हिसेस्मध्ये आत्ता reload पर्याय समाविष्टीत आहे जे iptables नियमांना ताजे करते, विना मॉड्युल्स्ला लोड अशक्य किंवा पुनः लोड करून तसेच आधिपासूनच-स्थापीत जोडणी वगळून.
RPM करीता xz समर्थन
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये, LZMA एंक्रिप्शनचा वापर करणारे संकुलांचे कम्प्रेशन/डिकम्प्रेशन हाताळण्याकरीता RPM xz संकुलचा वापर करतो.
python-ctypes संकुल
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये नवीन python-ctypes संकुल समाविष्टीत आहे. python-ctypes एक पायथन मॉड्युल आहे जे पायथनमधील C डाटा टाइपचे निर्माण व मॅनिपुलेशन हाताळते, व डायनॅमिक लिंक लाइब्ररिज् (DLLs) किंवा शेअर्ड लाइब्ररिज मधील फंकशन्स् हाताळते. पायथन मध्ये या लाइब्ररिज्चे ऱ्यापिंग स्वीकारते. हे संकुल iotop युटिलिटिचे अवलंबन म्हणून प्रतिष्ठापीत केले जाते.
unixOBDC ची 64-बिट आवृत्ती
unixODBC ची नवीन 64-बिट आवृत्ती unixODBC64 संकुल अंतर्गत Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये समाविष्ट केली आहे. unixODBC64 संकुल सह, ठराविक निर्देशीत डाटाबेस समर्थन पुरवणारे दोन संकुले समाविष्ट केले आहे: mysql-connector-odbc64postgresql-odbc64. तिसरे-पक्षीय ODBC ड्राइव्हर्स् सह अंतर्भूत करायचे असल्यास वापरकर्त्यांना unixODBC64, व नंतर postgresql-odbc64 व/किंवा mysql-connector-odbc64 प्रतिष्ठापीत करण्यास संकुल प्रतिष्ठापीत करण्यास शिफारस केले जाते.
iotop युटिलिटि
नवीन iotop युटिलिटि समाविष्ट केली आहे. iotop हा top युटिलिटि प्रमाणेच युजर इंटरफेस पायथन कार्यक्रम आहे, व सुरू असणाऱ्या प्रोसेस्करीता त्याचा वापर सतत I/O कार्याची आकडेवारी दाखवण्यासाठी केला जातो.
BD-सक्षम gcc44 करीता binutils
Red Hat Enterprise Linux 5.8 मध्ये नवीन binutils220 संकुल समाविष्टीत आहे, जे gcc44 सह कंपाइल करतेवेळी BD सूचनाचा वापर करण्यास सक्षम आहे. यामुळे वापरकर्ते कार्यक्रम बिल्ड करू शकतात जे AMD Bulldozer CPU गुणविशेषचा वापर करतात.
सुधारणानंतर httpd सर्व्हिस पुनःसुरू करणे
httpd संकुल सुधारित केल्यावर httpd सर्व्हिस आत्ता स्वयंरित्या पुनःसुरू केली जाते.
केर्बेरोस् तडजोडकरीता कर्ल समर्थन
दूरस्त मशीन्स्सह केर्बेरोस ओळख वापरण्यासाठी curl युटिलिटिमध्ये आत्ता तडजोड प्रॉक्सी समर्थन समाविष्टीत आहे.
vsftpd करीता ssl_request_cert पर्याय
vsftpd संकुलमध्ये आत्ता ssl_request_cert पर्याय समाविष्टीत आहे जे क्लाएंट प्रिमाणपत्र तपासणी बंद करण्यास सहमती देते. सुरू असल्यास, vsftpd येणाऱ्या SSL जोडणीकरीता प्रमाणपत्रसाठी विनंती (परंतु आवश्यक असे काहिच नाही) करतो. या पर्यायकरीता पूर्वनिर्धारित सेटिंग (/etc/vsftpd/vsftpd.conf फाइलमध्ये) म्हणजे Yes आहे.
hwdata संकुलमध्ये डिव्हाइस IDs समाविष्टीत केले
hwdata संकुलमध्ये हार्डवेअर प्रवेश तसेच ओळख व संरचना डाटा दाखवण्याकरीता साधने समाविष्टीत आहे. खालील हार्डवेअरकरीता डिव्हाइस IDs समाविष्टीत केले आहे:
  • Intel Core i3, i5, i7 व इतर प्रोसेसर्स् पूर्वी "सँडि ब्रिज्" असे म्हटले जात असे
  • नवीन HP इंटिग्रेटेड लाइट्स्-आउट 4 (iLO) साधने
  • अथेरोस् 3x3 a/g/n (मडैरा) वायरलेस LAN

आवृत्ती इतिहास

आवृत्ती हतिहास
आवृत्ती 1-0Thu Feb 16 2011Martin Prpič
Release of the Red Hat Enterprise Linux 5.8 Release Notes